पुणेसामाजिक

संतोष आप्पा मुरकुटे यांनी स्वखर्चाने केली कोलवडी मांजरी रस्त्याची दुरुस्ती येथील नागरिकांना मिळाला दिलासा.

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.१८: मांजरी खुर्द, कोलवडी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व स्थानिक प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. अनेक ठिकाणी अक्षरशः रस्त्याची चाळण झाली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून कोलवडी येथील साई गणेश ना. सह. पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष आप्पा मुरकुटे व सुषमा मुरकुटे यांनी स्वखर्चाने रस्त्यावर व दुतर्फा मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात आला. याठिकाणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे, ग्रामस्थ व स्वतः मुरकुटे तेथे उभे राहून साईड पट्ट्यांमध्ये टाकलेला मुरुम रोलच्या साह्याने रोलिंग करून घेत होते. काही ठिकाणी साईड पट्टी भरताना अडचण आली पण ती सोडवत रस्ता दुरुस्त केला.
या खराब रस्त्यामुळे कोलवडी मांजरी परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात वहातुकील मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे समस्या अधिकच गंभीर झाली होती. यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते.
संतोष आप्पा मुरकुटे यांनी नागरिकांची होणारी गैरसोय, अडचण ओळखून सुरक्षित व सुकर वहातुकीसाठी स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती केली. दुरुस्ती नंतर रस्ता स्वच्छ व समतल आणि वापरास योग्य स्वरूपात उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत संतोष आप्पा मुरकुटे यांचे आभार मानले.

Spread the love

Related posts

महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशन च्या अध्यक्षपदी सैनिक नेते शिवाजी अण्णा यांची बिनविरोध निवड..

admin@erp

भेकराईमाता विद्यालयात क्रांतिदिन, आदिवासी दिन साजरा

admin@erp

राहुल दादा करपे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद —आमदार शशिकांत शिंदे

admin@erp