प्रतिनिधी : – भगवान खुर्पे
श्री पांडुरंग मंदिर लोकार्पण सोहळा व मुर्ती प्रतिष्ठापना कलश रोहण कार्यक्रम रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाला.
शनिवारी सकाळी दहा वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन केले. यामध्ये मंदिराचा कलश श्री पांडुरंग रुक्माई मूर्ती ची मिरवणूक भव्य दिव्य रथामध्ये काढण्यात आली तसेच दिंडीमध्ये अनेक झेंडेकरी तुळशी, कळशी, भजने,हरी नाम घोष केला गेला या मध्ये महिला मंडळांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला, या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लोकवर्गणीतून सुमारे 60 ते 70 लाखापर्यंत निधी उभा राहिला या निधी उभारण्यासाठी दीपक लांडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश भुजबळ, भैरवनाथ मुळोबा ट्रस्ट मंदिर, अध्यक्ष महेश भुजबळ,संजय जाधव, प्रदीप पाठक,जालिंदर भुजबळ सुदाम देडंगे, विकास खेडकर, दशरथ सायकर, ज्ञानेश्वर धाडगे व सर्व ग्रामस्थ श्री सद्गुरू पांडुरंग महाराज पायी दिंडी सोहळा वारकरी यांचा मोलाचा सहभाग होता.
श्री पांडुरंग महाराज यांची संजीवनी समाधी मंदिराचे पडझड झाली असल्याने ताबडतोब श्री सद्गुरू पांडुरंग महाराज ट्रस्ट यांनी लोकसभागाला आवहान करून मंदिराच्या जिर्णोद्धरासाठी मदतीची मागणी केली . या आवहानला लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला कोणी देणगी स्वरूपात कोणी वस्तू स्वरूपात अवघ्या काही महिन्यामध्येच मंदिराला दिव्य भव्य स्वरूप निर्माण झाले
सकाळी होम हवन, मूर्ती प्राण प्रतिष्ठा, कलशारोहण असे कार्यक्रम झाल्यानंतर किर्तन औदुंबर गदादे यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.भैरवनाथ मुळोबा मंदिर जीर्णोद्धार अनुभव पाठीशी असल्यामुळे बांधकाम, देणगी जमा करणे आदी कामे करताना कोणत्याही अडजण भासली नाही असे रमेश भुजबळ यांनी सांगितले.