प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
कस्तुरी मळवट चंदनाची उटी!
रुळे माळकंठी वैजयंती !!
मांजरी दि.२३: मोगऱ्याची सुवासिक फुले, झेंडूची फुले आणि गुलाब वापरून सुशोभित करण्यात आलेल्या थेऊर येथील अष्टविनायकांपैकी एक श्री चिंतामणी गणपती मंदिरात गुरुवार (दि.२२) रोजी वासंतिक चंदन उटी सोहळा आयोजित करण्यात आला. चंदन उटी सोहळ्यासह मुक्त द्वार भंडारा देखील मंदिरात पार पडला.
श्री क्षेत्र थेऊर श्री चिंतामणी गणपती पदस्पर्शाने पावण झालेल्या पवित्र भूमीमध्ये ऐतिहासिक स्वरूपाचा वासंतिक चंदन उटी मोगरा महोत्सव आणि वारकरी भजन सोहळा २०२५ रोजी समस्त ग्रामस्थ चिंचवड देवस्थान गावातील सर्व वारकरी भजनी मंडळींच्या व आगलावे पुजारी आयोजनातून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला.या कार्यक्रमाला पूर्व हवेली वारकरी संप्रदायाच्या वतीने ३० ते ३५ गावे श्री क्षेत्र थेऊर, कोलवडी, कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, सोरतापवाडी, उरुळी कांचन, म्हतोबाची आळंदी, लोणी काळभोर, कदम वाकवस्ती, केसनंद, कोंढवा,येवलेवाडी, पेरणे, फुलगाव, गोलेगाव, कोरेगाव भीमा, शेवाळवाडी, डोंगरगाव, मांजरी खुर्द, आव्हाळवाडी, वाघोली, शिंदवणे, भेकराई, फुरसुंगी, कोरेगावमुळ इ.गावातून वारकरी मंडळी भजन सेवा करण्यासाठी आली होती. चैत्र वैशाख महिन्यामध्ये उन्हाळा असतो या कालावधीमध्ये थंड आणि शितलता येण्यासाठी चंदन उटी ही प्रत्येक मंदिरातील असणाऱ्या मूर्ती वरती चंदन उटी लावली जाते व त्यानिमित्ताने अध्यात्मिक वारकरी संप्रदाय कार्यक्रमाचे नियोजन केल्याची माहिती विश्वस्त ह भ प आनंद महाराज तांबे यांनी दिली. संघटन व्यासपीठ विचारमंच तयार व्हावा अखंडत्व आणि वारकरी संप्रदायाची भगवंताचे संतांचे नामस्मरण व्हावं हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून ही सेवा संपन्न करण्यात आली. गावातील सर्व मंदिरातील मूर्ती यांना चंदन उटी लावून पूजा करुन सायंकाळच्या वेळेस श्री चिंतामणी गणपती बाप्पांना चंदन उटी लावण्यात आली. मोगरा आरस आणि वारकरी संप्रदायाची भजन सेवा यावेळी पार पडली. सामुदायिक आरती करुन आलेल्या सर्व वारकऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.