प्रतिनिधी :- निलेश जगताप
श्री गजानन महाराज यांच्या 115 वी पुण्यतिथीचा कार्यक्रम श्री गजानन महाराज मंदिर राऊतवाडी, शिक्रापूर येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ‘ मी गेले असे मानू नका ‘ मी येथेच राहील असे भक्तांना आश्वस्त करून श्री गजानन महाराजांनी,शेगाव येथे संजीवन समाधी घेतली. महाराजांनी सांगितलेल्या या गोष्टीची आजही ठायी ठायी प्रचिती येते. 32 वर्षाच्या अवतार कार्यात त्यांनी अनेक भक्तांचा उद्धार केला व त्यांना भक्ती मार्गाला लावले. सर्व नात्यांना स्थळ, काळ,वेळेच्या मर्यादा असतात पण भक्त आणि भगवंत यांचे नाते या भौतिक जगापलिकडचे असते हाच भाव या कार्यक्रमातून अभिव्यक्त होत होता.
शिक्रापूर येथे झालेले या कार्यक्रमात भक्तांनी दर्शन ,भजन ,महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी शिक्रापूरचे सरपंच श्री रमेशभाऊ गडदे साहेब, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन दीदी, श्री गजानन महाराज मंदिर शिक्रापूर चे अध्यक्ष अभिषेक राऊत , आरती शिंदे, गजानन जोगदे , सारिका ताई वाबळे, शरद पाटील दरेकर, सारिका ताई चव्हाण कर्तव्य फाऊंडेशन च्या अध्यक्षा मनिषा ताई गडदे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शब्दपुष्प रचिता रविंद्र बाविस्कर सर तसेच त्यांचे समवेत पुण्यावरून आलेले महाराजांचे अन्य भक्त मंडळी उपस्थित होते.
यहा कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी सर्व भक्तांचे, देणगीदारांचे ,सेवाभावी सेवकांचे सहकार्य लाभले. सेवकांनी उत्कृष्ट नियोजन करून हा कार्यक्रम संपन्न केला असे गौरवोद्गार जमलेल्या सर्व मान्यवरांनी व भक्तांनी व्यक्त केले.यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री हरिभाऊ गंगाराम राऊत यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली.श्री अभिषेक राऊत यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वढू येथील माहेर संस्थेला मदत केली. महिला भगिनींनी केलेले भजन तसेच साला बाद प्रमाणे यावेळीही संदीप खर्चे यांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
