शैलेंद्र बेल्हेकर यांना शौर्य समाजरत्न पुरस्कार प्रदान करताना दशरथ यादव व हरिदास भिसे
हडपसर : युवा पिढीच्या निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर तळमळीने काम करणारा कार्यकर्ता हा खरा समाजरत्न पुरस्काराचा मानकरी आहे असे अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ यादव यांनी सांगितले.
शौर्य करियर अकॅडमी हडपसरच्या वतीने “शौर्य समाजरत्न पुरस्कार २०२५” व्यसनमुक्ती जनजागृती अभियान गेले अनेक वर्षापासून राबविणारे सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र बेल्हेकर यांना दशरथ यादव व हरिदास भिसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शौर्य करिअर अकॅडमीचे संचालक हरिदास भिसे, माजी नगरसेवक सुनील बनकर, रेश्मा भिसे,दादासाहेब सोनवणे,आदिक ओव्हाळ हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यादव पुढे म्हणाले की,बेल्हेकरांच्या सारखे निस्वार्थीपणे सामाजिककार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराच्या माध्यमातून पाठीवर शाबासकीची थाप दिली तर ते अधिक चांगल्या प्रकारे जबाबदारीचे भान ठेवून काम करतात.
