नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
मांजरी ता.१३: शेवाळेवाडी (ता.हवेली) येथील भवरावस्ती या ठिकाणी गुरूवार (ता.१३) रोजी दुपारी दीडच्या सुमारास बिबट्या रस्ता ओलांडत असताना ओंकार घाडगे यांना दिसला. यानंतर स्थानिक तरुणांनी तातडीने त्याचा फोटो काढून पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांना पाठवला असता त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनचे प्रमुख संजय मोगले यांना व पुणे वनपाल शितल खेंडके यांना तातडीने घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेच मांजरीचे पीएसआय महेश कवळे विजयकुमार ढाकणे व त्यांचा सर्व स्टाफ तसेच वनरक्षक प्रिया अकेन यांनी भवरा वस्ती या ठिकाणी भेट देऊन बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात पाहणी करून त्याचे ठसे मिळविले, बिबट्या या परिसरात आहे याची खात्री पटल्यानंतर या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खबरदारी म्हणून तातडीने कॅमेरे लावून आवश्यकता भासल्यास पिंजरा लावण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी यावेळी वनाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे. हा बिबट्या आता द्राक्ष बागातदार संघाच्या परिसरात असल्याची खात्री लाईक माहिती तेथील महिला कामगारांनी दिली. तसेच काल रात्री अकरा वाजता हिंगणे वस्ती या ठिकाणीही काही महिलांनी हाच बिबट्या पाहिला होता अशी माहिती माजी उपसरपंच अमोल जगताप यांनी दिली. परिसरातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. शक्यतो रात्री कुणीही बाहेर पडू नये असे आवाहन वन अधिकारी व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
