प्रतिनिधी :- निलेश जगताप
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी
निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील युवा कवी आकाश हरिभाऊ भोरडे यांच्या स्वलिखित ग्रामीण शेतीमातीच्या व शेतकऱ्याच्या जीवनावरील कवितांच्या ‘झालं बाटुकाचं जिणं’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे व जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आकाशने लिहीलेल्या शेती, माती, निसर्ग, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयांच्या सर्वच कविता दर्जेदार व युवकांना प्रेरणा देणाऱ्या असुन शिरूर सारख्या ग्रामीण भागातील युवकाची कविता पाठ्यपुस्तकात यावी असे प्रतिपादन शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी व्यक्त केले. “झालं बाटुकाचं जिणं’ या कवितासंग्रहात सत्तरहुन अधिक कविता असुन, पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे यांची प्रस्तावना व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप सांगळे यांची पाठराखण असुन हा कविता संग्रह काबाडकष्ट करणाऱ्या वडिलांच्या कष्टांला समर्पित केला आहे.
याप्रसंगी कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा गडदे, ज्येष्ठ पत्रकार नागनाथ शिंगाडे, संजय देशमुख, प्रवीणकुमार जगताप, नूरमहम्मद मुल्ला, सचिन धुमाळ, उदयकांत ब्राम्हणे, शेरखान शेख, सुनील पिंगळे, घनश्याम तोडकर, निलेश जगताप, अतुल थोरवे, विजय ढमढेरे, मंदार तकटे आदी उपस्थित होते.

