प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.४: ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप च्या साह्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल द्वारे ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी १ऑगस्ट २०२५ पासून करावी. महसूल विभागाच्या ई- पीक पहाणी प्रकल्प दि.१५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम २०२४ पासून पीक पाहणी ही डिजिटल क्राॅप सर्वे प्रणाली द्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.
सध्या खरीप हंगामातील पिक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगामात २०२५ साठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल एक चे व्हर्जन 4.0.0 अध्ययन स्वरूपात गुगल पे स्टोअर वर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲप अपडेट करून घ्यावे.
वरील हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी १५ सप्टेंबर २०२५ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तथापि शेतकऱ्यांनी सहाय्यकावर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील. अप्पर जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले की त्यांनी खरीप २०२५ ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी.
ई-पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो.तसेच कृषी विभागाला पिकांची अचूक माहिती मिळते व सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद होते.