प्रतिनिधी : – निलेश जगताप
शिक्रापूर :-
पी एम श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर या ठिकाणी दिनांक 16 जून 2025 रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उस्तवात पार पडला.
उद्याचे भविष्य असलेले बाल चमु आनंदाने शाळेत येताना दिसून आले.या विद्यार्थ्यांचे स्वागत सर्वप्रथम प्रवेशद्वाराजवळ सुवासिनींनी ओवाळून केले त्यानंतर विद्यार्थ्यांना वाजवत गाजवत फुलांच्या वर्षांमध्ये शाळेत प्रवेश देण्यात आला.
इयत्ता पहिलीच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी शिक्रापूर नगरीचे aप्रथम नागरिक शिक्रापूरचे सरपंच माननीय श्री रमेश गडदे , उपसरपंच श्रीमती वंदना भुजबळ,माजी उपसरपंच पूजा भुजबळ,ग्रामपंचायत सदस्य शालन राऊत,ग्रामपंचायत सदस्य श्री त्रिनयन कळमकर तसेच माजी उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती चे शिक्षण तज्ञ नवनाथ भाऊ सासवडे,माजी उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी सुभाष मामा खैरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सनी शेठ जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत मांढरे, व्यवस्थापन समिती सदस्या शितल जाधव अर्पणा ढोले, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर दरवडे, दादा पाटील मांढरे, तसेच शिक्षण विभागातर्फे डायटचे अधिव्याख्याता आदरणीय श्री जाधव साहेब, विषय तज्ञ संजना आरोडे मॅडम, शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रकाश लंघे सर,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साधना शिंदे मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते…
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शूज देण्यात आले.
तसेच या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने “मुल तुमचे झाड आमचे ” या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत शिक्रापूर तसेच शाळेच्या वतीने पालकांना झाडांची रोपं वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना शिक्रापूर नगरीचे सरपंच यांनी ज्या पद्धतीने शाळा आपल्या मुलांचे पालकत्व, जबाबदारी स्वीकारते त्याच पद्धतीने आपणही दिलेल्या झाडाचे पालकत्व स्वीकारावे असे आवाहन सर्वांना करण्यात आले. श्री नवनाथ भाऊ सासवडे यांनी मुलं ही संस्कारक्षम असतात तेव्हा मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत चॉकलेट वाटण्यापेक्षा शालेय उपयोगी वस्तू देऊन शाळेसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आव्हान केले. शिक्रापूर नगरीच्या माजी उपसरपंच पूजा भुजबळ यांनी बदलत्या शैक्षणिक पद्धतीचे कौतुक करून शासनाने मुलांसाठी तयार केलेले आनंददायी वातावरणासाठी प्रशासनाचे आभार मानले.
तसेच शिक्रापूरचे माजी उपसरपंच श्री सुभाष मामा खैरे यांनी पालकांना अधिकारा बरोबर कर्तव्याचेही पालन करून शाळेसारख्या सामाजिक संस्थेला मदत करण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री टाकळकर सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सनिशेठ जाधव यांनी मांडले.