प्रतिनिधी :- निलेश जगताप
शिक्रापूर विकास सेवा सह संस्था मर्यादित शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे संस्थेच्या चेअरमन पदी शिक्रापूर गावच्या प्रथम महिला सरपंच सौ चंद्रकला सोमनाथ भुजबळ यांची बिनविरोध निवड दिनांक 8 12 2025 रोजी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी श्री पी व्ही हराळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली सौ चंद्रकला सोमनाथ भुजबळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव श्री लक्ष्मण अनंता मोरे यांनी काम पाहिले संस्थेचे एकूण 2150 सभासद असून भाग भांडवल 50 लाख 90 हजार आहे संस्थेचे एकूण पीक कर्ज मध्य मुदत कर्ज वाटप 4 कोटी 50 लाख आहे संस्थेला सन 2024 -2025 या सालात 21 लाख 46 हजार नफा झालेला आहे. संस्थेने 105 व्या वर्षांत पदार्पण केले. असल्याने सन 2024-2025 या सालात 15% डिव्हीडंट वाटप केले आहे. संस्थेच्या चेरमन व व्हा.चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या प्रयत्नाने सन 2023 2-024 सालात उत्कृष्ट कामकाज वसुली बद्दल पुणे जिल्हा सह. बँक म पुणे बँकेचे अध्यक्ष श्री प्रा दिगंबर दुर्गाडे व ॲड श्री अशोक बापू पवार आमदार शिरूर हवेली विद्यमान संचालक यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळणे बद्दल चांदीची ढाल देऊन गौरवण्यात आले आहे सदर कार्यक्रमांमध्ये माजी सरपंच बापूसाहेब जकाते, श्री आबासाहेब करंजे, मोहनशेठ विरोळे, सोमनाथ भुजबळ,ॲड अरुण सोंडे,बाबासाहेब सासवडे, सुभाष खैरे,रमेश भुजबळ, पूजाताई भुजबळ मा.उपसरपंच शिक्रापूर, बाळासाहेब वाबळे, पंढरीनाथ राउत सर्व संचालक सुनील भूमकर, निलेश थोरात,संदिप गायकवाड, गौरव करंजे, अनिल राऊत, दत्तात्रय मांढरे, शिवाजी जकाते, जालिंदर केवटे, दत्ता राऊत, विठ्ठल सोंडे, बाळासाहेब राऊत, आदि उपस्थित होते.आभार सौ पूजाताई दीपकराव भुजबळ यांना मानले.
