Uncategorizedपुणेशैक्षणिक

शाळा बंद आंदोलन ; शिक्षक शिक्षकेतर संघटनांच्या समन्वय समितीचा एल्गार..

पुण्यात ०५ डिसेंबरला मोर्चा..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

पुणे ता.१ : टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा, राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती तत्काळ सुरू करावी यासह विविध मागण्यासाठी राज्यातील सर्व शाळा येत्या ०५ डिसेंबर २०२५ रोजी बंद करून सर्व राज्यातील ३५ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनाची माहिती देण्यासाठी सोमवार( दि. ०१) रोजी पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे येथे पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेला सुनिल जगताप, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र,
शिवाजी खांडेकर, के.एस. ढोमसे,नंदकुमार सागर, नारायण शिंदे,हनुमंत चव्हाण, रणजित बोत्रे, सचिन डिंबळे सर,ज्ञानेश्वर गायकवाड,राजेश गायकवाड, सागर आटोळे संग्राम कोंडेदेशमुख आदी पुणे जिल्हा समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Related posts

कोलवडी येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा..

admin@erp

प्रभाग १५ – मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसतरानळी..

admin@erp

तमालपत्राचे फायदे ….

admin@erp