प्रतिनिधी :- निलेश जगताप
महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी माता तुळजापूर , श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट , श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी श्री क्षेत्र अरण , फिरंगाई माता कुरकुंभ, तुकाई देवी माता पारगाव, भैरवनाथ माता जोगेश्वरी मंदिर आलेगाव पागा अशाप्रकारे सर्व तीर्थक्षेत्र या ठिकाणी नवरात्र उत्सव निमित्ताने शरदराव रासकर यांच्या माध्यमातून अल्प दरामध्ये वरील सर्व दर्शनासाठी आलेगाव पागा आरगाव या गावातील महिलांना या ठिकाणी दर्शनाला जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. आतापर्यंत अयोध्या, काशी, उज्जैन, चित्रकूट, प्रयाग राज, शेगाव,अष्टविनायक , कोकण दर्शन, महाराष्ट्र राज्य सह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अशा अनेक राज्यांमध्ये 500 हुन जास्त माता बहीणींना व भक्तांना अल्पदरामध्ये भाविक भक्तांची दर्शनाची सोय केली जाते यावेळी सौ आणिता तोंडे सरपंच ,सौ अलका तोंडे, सौ ताराबाई तोंडे,सौ नंदा शिंदे,सौ संगिता रसाळ, सौ अनुराधा संपकाळ आलेगाव पागा आरणगाव सह अनेक गावांमधील महीला बहीणींना याचा लाभ झाला आहे यामध्ये मातोश्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स दत्तात्रय चव्हाण यांच्या माध्यमातून गाडीची व्यवस्था केली जाते यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे तसेच सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित ही दर्शन यात्रा काढण्यात येत आहे संस्थापक अध्यक्षा सौ कांताताई पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली महीलांना अल्पदरात सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे मत शरदराव रासकर प्रदेश सल्लागार सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी मत व्यक्त केले आहे.

