प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
सोमवार दिनांक 28 जुलै रोजी शिक्रापूर व्यावसायिक असोसिएशन व शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच शिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्रापूर पाबळ चौक येथे वाहतूक कोंडी समस्या वरती कारवाई करण्यात आली. पाबळ चौक येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याकारणाने सर्व व्यावसायिक चिंता व्यक्त करत होते, त्यामुळे शिक्रापूर व्यवसायिक असोशियन व शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच शिक्रापूर ग्रामपंचायत यांनी कारवाई करून दोन्ही साईडचे सर्व फुटपाथ वरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली व सम विषम पार्किंग करण्यासाठी दोन्ही बाजूने माहिती फलक लावण्यात आले आहेत.
या कारवाईत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड साहेब, संदीप कारंडे साहेब, व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, शिक्रापूर ग्रामपंचायत सरपंच रमेश गडदे, भाजप नेते राजाभाऊ मांढरे, उपाध्यक्ष संभाजी मांढरे, सचिव निलेश राऊत, खजिनदार प्रकाश चव्हाण, सहसचिव शरद टेमगिरे, दिलीप कोठावळे, निलेश गायकवाड, काळुराम शिवले, अतुल पानमंद, प्रकाश चव्हाण, अनिल काळे, मोहन भुजबळ, बबन चव्हाण, सुनील भुमकर, डॉक्टर कळमकर तसेच ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व सगळे व्यावसायिक बंधू उपस्थित होते. या कारवाईमुळे सर्व व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्व व्यवसायिकांनी शिक्रापूर व्यावसायिक असोसिएशनला चांगल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या.