प्रतिनिधी :- निलेश जगताप
शिक्रापूर दि 29 11 2025 रोजी अरुण कुमार वैद्य स्टेडियम भवानी पेठ पुणे या ठिकाणी विभागस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा पार पडल्या यामध्ये श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल शिक्रापूर इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी कु अर्णव कुमार बरकडे या खेळाडूने आपल्या खेळाचे जबरदस्त प्रदर्शन करून या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले या खेळाडूला विशेष करून बॉक्सिंग प्रशिक्षक विशाल गुजर व क्रीडा शिक्षक आकाश वाडेकर यांनी त्याला चांगले मार्गदर्शन केले. शाळेचे प्राचार्य संदीप चौधरी शालेय संस्थेच्या अध्यक्षा सौ मनीषा सायकर यांनी खेळाडूचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिले. तसेच संस्थेचे संस्थापक सोमनाथ तात्या सायकर यांनी खेळाडूचा सन्मान करून पुढील येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन पदक मिळवावे अशी अशा व्यक्त केली.
