प्रतिनिधी:- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शालेय सार्वत्रिक निवडणूक 2025 रोजी राबविण्यात आले.सार्वत्रिक निवडणूक व मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते याचे ज्ञान विद्यार्थ्यांनाअवगत होण्यासाठी रायकुमार बी गुजर प्रशालेने लोकशाही मतदान प्रक्रियेचा उपक्रम राबवला.सयंत्र मतदान पेटी ,मतमोजणी,निकालाचे घोषणा व निवडणूक अधिकारी असे यंत्रणा राबवण्यात आले.
या प्रक्रियेमध्ये एकूण 15 उमेदवारी अर्ज आले होते प्रचारासाठी मुलांना स्वाध्याय, पाठांतर, सुव्यवस्था, शिस्त समन्वय ,उपक्रम मदत करणे असे मुद्दे देण्यात आले होते.
मतदान प्रक्रियेमध्ये शासकीय यंत्रणाचे कामे कसे असतात हे जाणण्यासाठी उमेदवारी अर्ज भरणे,अर्ज छाननी, चिन्ह वाटप, प्रचार ,जाहीर सभा, आचारसंहितेचे पालन ,मतदानाधिकारी नेमणूक, ओळखपत्रासह झालेले मतदान, निवड प्रक्रिया, प्रमाणात,शपथविधी इत्यादी उत्कृष्टपणे पार पडले.या प्रक्रियेसाठी प्रशालेतील सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अविनाश कुंभार प्रशालाचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे उपमुख्याधिपिका सुनीता पिंगळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
या शालेय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रशालेची विद्यार्थिनी सृष्टी हळंदे हिची मुख्यमंत्री म्हणून तर सुरज भुजबळ या विद्यार्थ्याचे उपमुख्यमंत्री म्हणून बहुमताने निवड झाली या उपक्रमासाठी प्रशालेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या