प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे येथील समाजभूषण संभाजीराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया तर्फे वारकरी दिंडीचे आयोजन केले होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थी वारकऱ्यांचा वेश परिधान करून हातात पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषावर गावातून दिंडीची मिरवणूक काढली दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण, ऑक्सिजन, पाणी बचत,वृक्ष लागवड ,सामाजिक व धार्मिक वातावरण निर्मिती बाबत विविध फलक हातात घेऊन गावातून विद्यार्थ्यांनी संदेश दिला ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करून दर्शन घेतले यावेळ उद्योजक नवनाथ भुजबळ यांनी केळीचे व चहाचे वाटप केले. यावेळी ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शिवाजीराव भुजबळ तसेच अध्यक्षा मंगल भुजबळ, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण अनेक महिला तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते तळेगाव ढमढेरे येथील बाजार मैदानामध्ये दिंडीचे रिंगण करण्यात आले या ठिकाणी आरपीआय शिरूर तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी श्री शिवाजीराव भुजबळ साहेब यांचा सन्मान केला. तसेच विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे कौतुक केले याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मयूर भुजबळ तसेच सतीश भुजबळ, प्रकाश टिळेकर, तळेगाव सोसायटीचे चेअरमन श्रीपती भुजबळ, बबनराव भुजबळ ज्ञानेश्वर नरके, पोपट शेलार तसेच पालक उपस्थित होते. दिंडीचा सांगता समारंभ विद्यालयाचा कला शाखेचा विद्यार्थी सोहम ढमढेरे यांच्या प्रवचनाने झाला दिंडीचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख शालन खेडकर आणि सहकारी शिक्षकांनी केले होते.