प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
फुरसुंगी : – श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट, फुरसुंगीच्या श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालयातील १११ विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त होते. ही गरज ओळखून फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास, इंग्रजी व्याकरण पुस्तक असे साहित्य देण्यात आले. फाउंडेशन च्या समन्वयक प्रियांका भोसले यावेळी उपस्थित होत्या. विद्यालयातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. या शैक्षणिक मदतीमुळे आमच्यासारख्या गरीब कुटुंबातील मुलांचा शिक्षणातील उत्साह वाढेल, असे मत मदत मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केले. या सहकार्याबद्दल मुख्याध्यापक डॉ. सुनील कामठे, उपमुख्याध्यापक सुनील दीक्षित, पर्यवेक्षिका यास्मिन इनामदार यांनी संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीने सेवा सहयोग फाउंडेशन चे आभार व्यक्त केले. एकनाथ देशमुख, मारुती खेडकर, सुनीता कामठे, कृष्णा डेरे, पूजा दरेकर, नितीन बनसोडे, ज्ञानेश्वर राखपसरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन स्वप्नील गिरी यांनी केले.