प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
पुणे ता.१९: लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीतील पुणे अहिल्यानगर रोडवरील पेरणे फाटा ता.हवेली जि. पुणे येथील विजयस्तंभ येथे लाखो अनुयायी यांचे वतीने एक जानेवारी २०२६ रोजी विजयस्तंभास अभिवादनासाठी देशभरातून सुमारे दहा ते पंधरा लाख अनुयायी येण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात माहिती देण्यासाठी तसेच सर्व संघटनांचे प्रमुख व कार्यकर्ते तसेच अनुयायी यांचेकडून सूचना जाणून घेण्यासाठी मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4, हिम्मत जाधव, पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा, श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली जयस्तंभ अभिवादन २०२६ चे पूर्वतयारी संदर्भात पोलीस प्रशासनाचे वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व संघटना प्रमुख, कार्यकर्ते, पत्रकार यांनी शुक्रवार दिनांक २१ /११ /२०२५ रोजी सकाळी ११ वाजता येरवडा पोलीस स्टेशन शास्त्रीनगर चौक येरवडा पुणे येथे बैठकी करता उपस्थित राहणे बाबतचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन सर्जेराव कुंभार यांनी केले आहे.
