पुणेमहाराष्ट्रसंपादकीय

वारकरी संघाच्या तालुका अध्यक्षपदी जगताप, उपाध्यक्षपदी काळोखे यांची नियुक्ती…

प्रतिनिधी :- भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे दि.०६(वार्ताहर) :- तळेगाव ढमढेरे येथील प्रसिद्ध मृदंगवादक जनार्दन जगताप यांची शिरूर तालुका रामकृष्णहरी वारकरी संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे संघाचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प विश्वनाथ महाराज गरगडे यांनी सांगितले.तळेगाव ढमढेरे येथे आयोजित वारकरी संघाच्या आढावा बैठकीत तालुक्यातील ४५ भजनी मंडळ यांनी रामकृष्ण वारकरी संघात नोंदणी केली .तर ह. भ. प निर्मला टिळेकर यांना जिल्हा कार्यकारणी सदस्य तर ह. भ. प जयश्री काळोखे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

माजी आमदार ॲड .अशोक पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या सुविद्य पत्नी मनिषा कटके ,शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंद ढमढेरे,उपसभापती विश्वास ढमढेरे उपस्थित होते.

Spread the love

Related posts

सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी कमल भुजबळ यांची निवड…

admin@erp

मांजरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

admin@erp

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली.

admin@erp