आरोग्यउत्सवमहाराष्ट्रसामाजिक

वाढदिवसानिमित्त वायफट खर्चाला फाटा देत आरोग्य शिबिर.उद्योजक नवनाथ भुजबळ यांचा सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

तळेगाव ढमढेरे :- दि.१४(वार्ताहर) तळेगाव ढमढेरे येथील आरंभ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक नवनाथ भुजबळ यांनी वाढदिवसानिमित्त वायफट खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते .यामध्ये तळेगाव ढमढेरे परिसरातील 674 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यामध्ये 345 रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली . यामध्ये रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 113 शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी , 62 रुग्णांचे इसीजी, 104 रुग्णांचे एक्स-रे, 122 रुग्णांच्या दंत तपासणी व उपचार तसेच हाडांचे आजार ,मणक्याचे आजार ,स्नायूंचे आजार गुडघेदुखी, कंबर दुखी ,संधिवात ,रक्तांचे आजार ,उच्च रक्तदाब मधुमेह ,हृदयरोग ,आतड्यांचे आजार ,लिव्हरचे आजार असे विविध प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात आली. आजाराची निदान झाल्यानंतर त्याच ठिकाणी रुग्णांना गोळ्या औषधे देण्यात आली. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, अनाथ वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन अशा विविध उपक्रमांनी भुजबळ यांच्या समर्थकांकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी तालुक्यातून विविध स्तरावरील पदाधिकारी राजकीय पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुजबळ यांच्या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन भुजबळ यांचा मित्रपरिवार व आरंभ उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले होते.

Spread the love

Related posts

गवती चहा पिण्याचे फायदे…..

admin@erp

थेऊर येथील चिंतामणीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी…

admin@erp

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..

admin@erp