प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे दि.२९( वार्ताहर) तळेगाव ढमढेरेच्या सरपंचपदी रोहिणी सुदर्शन तोडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून माजी सरपंच दिपाली ढमढेरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.रोहिणी तोडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गणपत मरबळ यांनी सांगितले.
यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, अनिल भुजबळ, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ, तळेगाव ढमढेरे सोसायटी चे माजी चेअरमन संतोष ढमढेरे,प्रभारी सरपंच जबिन बागवान, माजी सरपंच अंकिता भुजबळ,स्वाती लांडे,दिपाली ढमढेरे, माजी उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, नवनाथ ढमढेरे, कोमल शिंदे, मनोज आल्हाट,कीर्ती गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे, मीनाक्षी ढमढेरे ,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, गावकामगार तलाठी दशरथ रोडे उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर तोडकर यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
