आयुर्वेदिकआरोग्य

रोज कच्चा कांदा खाण्याचे फायदे.

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

रोग प्रतिकार शक्तीः कांदा शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-सी असे अनेक गुण असतात, जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्यूनिटी वाढविण्यास मदत करतात.

कॅन्सरपासून बचावः कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात. ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखत नाहीत तर त्यांचा नाशही करतात. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी असतो. हाय ब्लड प्रेशरः जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने कच्चा कांदा खाल्ला पाहिजे. हृदयाशी संबंधित आजारांमध्येही कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका बर्याीच प्रमाणात कमी होतो.

पचनः पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलादच्या स्वरूपात खाऊ शकता. विविध संक्रमणांपासून आरामः कांद्यामध्ये अँटी एलर्जिक, अँटी ऑक्सिडेंट सारखे गुण असतात, जे शरीराचे अनेक प्रकारच्या इंफेक्शपासून संरक्षण करण्यास मदत करते.

लोह कमतरताः कांदाला लोह, फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. यामुळेच कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते.

Spread the love

Related posts

चंदनाचे आरोग्यदायी फायदे…

admin@erp

मध आणि मनुका सोबत खाल्ल्याने होतात हे फायदे …

admin@erp

अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व.

admin@erp