महाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

राष्ट्रीय माजी सैनिक किसान महा फेडरेशन अध्यक्षपदी शिवाजी अण्णा कदम यांची बिनविरोध निवड..

प्रतीनिधी :- निलेश जगताप

अनेक वर्षांपासून विखुरलेल्या सैनिकांचे सैनिक एकीकरणासाठी प्रयत्न होत होते परंतु प्रत्येक वेळेस अपयश येते होते. परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून आदरणीय जगन्नाथ खामकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय भीमराज आरेकर साहेब, भिकाजी भागवत साहेब, प्रशांत भगत साहेब, श्रीकृष्ण बंगाले साहेब, कमलेश्वर दाभाडे साहेब आणि ब्लॅक कमांडो पद्माकर चंदनशिवे यांनी स्वखर्चाने महाराष्ट्रभर दौरे करून माजी सैनिक परिवार जोडत गेले. आणि दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी राहता, शिर्डी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सैनिक एल्गार सभा आयोजित करण्यात आली. त्या ठिकाणी विविध ठिकाणावरून स्वखर्चाने 200 होऊन अधिक माजी सैनिक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

त्यामध्ये एकतेसंबंधी अनेक मान्यवरांची मनोगते झाली. सर्व संघटनिय सैनिक संघटना असावी आणि वीर नारी, शहीद परिवार आणि सैनिक परिवाराला भेडसावणाऱ्या समस्या आणि कल्याणार्थ कार्य करण्यासाठी एक कार्यकारिणी असावी यावर विचार विनिमय होऊन एकमताने अध्यक्ष,सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांच्या निवडी होऊन त्यांना शपथ देण्यात आली. त्यामध्ये आदरणीय शिवाजी अण्णा कदम यांना राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय देविदास साबळे यांना राष्ट्रीय सचिव तर आदरणीय सेवा नि. आर टी ओ ज्ञानदेव देवखिले यांना राष्ट्रीय कोषाध्यक्ष पद देण्यात आले. लवकरच बाकी पदाधिकाऱ्यांचा देखील विस्तार करण्यात येईल असे सर्वानुमते ठरले. कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण कोर कमिटी टीम ने केले होते.
सैनिक एकता जिंदाबाद आणि भारत माता की जय अशा घोषणा करून बैठकीची सांगता झाली.

*महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी – नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे.

  1. शिवाजी अण्णा कदम – अध्यक्ष
  2. देविदास साबळे – सचिव
  3. ज्ञानदेव देवखिले – खजिनदार
  4. कॅप्टन कमलेश्वर दाभाडे – उपाध्यक्ष (नागपूर व अमरावती विभाग)
  5. सौभाग्यवती सुचिता भोयर – महिला अध्यक्ष (नागपूर व अमरावती विभाग)
Spread the love

Related posts

तळेगाव ढमढेरे सरपंचपदी स्वाती लांडे बिनविरोध

admin@erp

क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांचे कार्य प्रेरणादायी- डॉ मुसमाडे

admin@erp

माजी सरपंच संजय जगताप यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे केले आव्हान.

admin@erp