आयुर्वेदिकआरोग्यखेळदेशपुणेफिटनेसमहाराष्ट्र

राष्ट्रीय किकबॉक्सिंग मध्ये सार्थक उंद्रेला सुवर्ण पदक…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.१ : खराडी, पुणे येथे आयोजित केलेल्या नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत मांजरी खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील “सार्थक समिर उंद्रे” याने आपल्या गटात सुवर्णपदक जिंकले. सार्थकचे वडील समिर उंद्रे हे शेतकरी कुटुंबातील असल्याने एका कष्टकरी शेतकरी कुटुंबातील या मुलाने सुवर्ण पदक मिळवल्याने कुटुंबात आनंदोत्सव साजरा केला गेला. सार्थकने या अगोदर अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पदकांची लयलूट केली आहे. त्याने तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर खेळत असताना चमकदार कामगिरी केली आहे. सार्थकने आता पर्यंत तालुका, जिल्हा, राष्ट्रीय पातळीवर १९ पदके मिळविली आहे. यामध्ये सुवर्ण तीन, सिल्व्हर एक असा पदकांचा समावेश आहे.मांजरी खुर्द गावातील नागरिकांकडून सार्थकचे अभिनंदन व कौतुक होत आहे. कोच विजय बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थकने या स्पर्धेची तयारी केली होती.
राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी, पुणे येथे ही स्पर्धा पार पडली. वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. देशभरातील उत्साह, जोश आणि ऊर्जेने भरलेली नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाली. तीन दिवसीय या उच्चस्तरीय स्पर्धेत 14 राज्यांतील 500 खेळाडू, 100 अधिकारी/कोच/पदाधिकारी तसेच 500+ प्रेक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी संपूर्ण वातावरण क्रीडाभावना, शिस्त आणि स्पर्धात्मक उत्साहाने भरून गेले होते.
या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अतुल घुले (4 टाइम नॅशनल प्रो चॅम्पियन व चेअरमन, चॅम्पियनशिप 2025) नितीन मुळे (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी) समन्वय समिती : मिलिंद श्रीराम, कैलास टिकोळे, श्रद्धा शिंगारे -नवले, पल्लवी किरवे, ओंकार किरवे, प्रियंका बडेकर, वैशाली घोडके, श्रुती घोडके, श्रवण घोडके, रोहन कांबळे, विवेक मोहिते व इतर सदस्य यांचे विशेष योगदान राहिले.
यावेळी नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री बापूसाहेब घुले यांनी पाहुण्यांचे स्वागत करून स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली.
ही संपूर्ण स्पर्धा सी. ए.तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष खैरनार (तांत्रिक संचालक),जयदेव महमाने (रिंग स्पोर्ट्स तांत्रिक संचालक) यांच्या उत्कृष्ट नियोजन व नेतृत्वामुळे अत्यंत व्यावसायिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
” खेळाडूंची जिद्द, समर्पण आणि फाईटिंग स्पिरिट हीच या स्पर्धेची खरी शान ठरली” असे नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशन N.G.चे अध्यक्ष बापूसाहेब घुले यांनी सांगितले.

Spread the love

Related posts

योगाचे सूक्ष्म व्यायाम(हलके व्यायाम/सुलभ क्रिया)

admin@erp

नवले पूल अपघात रोखण्यासाठी अल्पकालीन उपायांबाबत शनिवारी बैठक..

admin@erp

नारळ पाणी पिण्याचे फायदे..

admin@erp