शिक्रापूर : – प्रतिनिधी – निलेश जगताप
राजे श्री शिवशाही समूहाचा 11 वा वर्धापन दिन cafe 1906 शिक्रापूर येथे रविवारी 28 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा थाटात संप्पन्न झाला. सोहळ्याचे उदघाटन सि. लुसी कुरियन दिदी यांच्या शुभहस्ते महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून दीप्रर्ज्वलन करून करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून माहेर संस्थेच्या अध्यक्ष हिराताई, व्यवस्थापक रमेश चौधरी, मुक्तागण फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण कांबळे, सौ. कीर्तीताई पारसकर,सौ. सारिकाताई चव्हाण,सौ. नंदाताई भुजबळ, सौ. मंगलताई सासवडे,सौ. सुष्मा गायकवाड, ऍड. शिवाजीराव वाळके, श्री.शरद दरेकर श्री. मिलिंद ठोके,श्री. सुनिल पानगव्हाणे, श्री.शिवाजीराव घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.. उपस्थित मान्यवरांचा समूहाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
उदघाटक पदावरून भाषण करताना सि. लुसी कुरियन दिदी यांनी राजे श्री शिवशाही समूहाचे सामाजिक कार्य हे खरच माणुसकीची चळवळ उभी करते.. गेल्या 11 वर्षांपासून गणेशदादा चव्हाण यांचे कार्य मी नजरेने बघते.. माणूस छोटा आहे पण त्याचा दिल मोठा आहे त्याचे हे कार्य निरंतन असेच सुरू रहावे या छोट्याश्या रोपट्याचे विशाल असा वटवृक्ष व्हावा असा आशीर्वाद देत समुहाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.
समुहाच्या विस्तारासाठी काही जबाबदारी पद नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष श्री. गंगेश्वर सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. सुरेखाताई गायकवाड,खजिनदार पदी श्री. सुनिल सिताराम पानगव्हाणे, प्रवक्ता पदी सौ. कीर्तीताई पारसकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्री तेजस साळवे यांची नियुक्ती करण्यात आली.
गेल्या 10 वर्षाचा कार्याचा लेखा जोखा कवी गुलाबराजा फुलमाळी आणि अध्यक्ष गणेशदादा चव्हाण यांनी आपल्या भाषणातून कार्याचा आढावा मांडला. 10 वर्षात अनेक उपक्रम राबविताना हजारो हात समूहात सहभागी झाली. पुढच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष गणेशदादा चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी गुलाबराजा फुलमाळी यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष समीर खैरनार यांनी मांनले.
संदीप जाधव,समीर खैरनार,गौरव पवार, तेजस साळवे, संजय हजारे, अभिषेक वक्ते, रोहित थोरात, प्रतिक चव्हाण, संतोष काटुळे, विकास बोराडे, पवन भोरे, प्रशांत चव्हाण, प्रकाश आवारे समूहाचे आदी मान्यवर, स्वयंसेवक उपस्थित होते.