प्रतिनिधी : – निलेश जगताप
श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा हिवरे रोड शिक्रापूर येथे आज वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री शशिकांत गाडेकर सर यांच्या मार्गदर्शनातून कृषीदिन साजरा करण्यात आला. यावेळी सकाळच्या सत्रात विद्यार्थ्याची कृषी दिंडी काढण्यात आली यावेळी सर्व मुलांच्या हातात कृषिविषयक घोषवाक्य तसेच वेगवेगळ्या प्रकारची झाडे देऊन जय जवान जय किसान ह्या घोषात हे सर्व विद्यार्थी हे कृषिविषयक घोषणा देत होते . या नंतर कार्यशाळेचा परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते एक झाड लावण्यात आले तसेच कार्यक्रम दरम्यान आजच्या कृषी दिनाचं महत्व श्री प्रशांत साळवे सर यांनी समजून सांगितले. यावेळी कार्यशाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . सूत्रसंचलन विकास खाडे सर यांनी केले तर आभार शिवदत्त जाधव सर यांनी मानले.