पुणेमहाराष्ट्रसामाजिक

रस्त्यावर पाणी साचल्याने होडी चालवत आंदोलन… मांजरीतील नदीच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा …

अशोक आव्हाळे…

           मांजरी दि.२१: मांजरी बुद्रुक मांजरी खुर्द गावाला मुळा मुठा नदीवरील पुलाच्या मांजरी बुद्रुक बाजूने पुलाच्या ठेकेदाराने रस्त्याला व्यवस्थित भराव न केल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. येथील गजेंद्र बाबा मोरे यांनी या ठिकाणी आज बुधवार (दि.२१) रोजी या पाण्यातून होडी चालवत होडी आंदोलन केले आहे.
           गेली चार पाच दिवस सतत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने त्या ठिकाणी प्रचंड पाणी साठत आहे. वाहनचालकांना या पाण्यातून वाहनं चालविताना कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खाजगी व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात भराव केल्याने त्या ठिकाणाहून पाण्याचा निचरा व्हायचा बंद झाला आहे तर दुसऱ्या बाजूने बांधकाम विभागाची आरसीसी भिंत असल्याने पाणी जाऊच शकत नाही. या कामाला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
           सतत च्या पावसामुळे नदीच्या पुलाच्या अलीकडे पाणी साचले आहे सर्वजनिक बांधकाम विभाग व पी एम आर डी ए व पी एम सी चे च्या गलथान कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे… आज आम्ही प्रशासना चा निषेध म्हणून होडी आंदोलन केले असल्याचे गजेंद्र बाबा मोरे यांनी सांगितले.
           बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नकुल रणसिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की लवकरात लवकर त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

Spread the love

Related posts

मांजरी खुर्द आणि परिसरात धुंवाधार पाऊस

admin@erp

श्री पांडुरंग विद्या मंदिर, विठ्ठलवाडी येथे गुरुपौर्णिमा साजरी.

admin@erp

बांधकाम विभागाने घेतली बातमीची दखल..

admin@erp