देशपुणेमहाराष्ट्रराजकीय

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात कुठलाही गैर व्यवहार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२: थेऊर (ता.हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना गेली १४ वर्षे बंद असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा कारखाना चालू करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन त्यांनी आज पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न केला असल्याने येथील सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे. नुकतीच यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालकांसमवेत घेतली असून कारखान्याच्या व्यवहारात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
पुणे येथील सर्किट हाऊस मध्ये विविध विभागांच्या आढावा बैठका अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. या दरम्यान यशवंत सहकारी साखर कारखान्याची ही बैठक घेतली. यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे हा व्यवहार पणन विभाग आणि सहकार विभाग यांच्याशी संबंधित आहे. या दोन्ही संस्था शेतकऱ्यांच्या मालकीच्या असून त्या हवेली तालुक्यातील आहे. या व्यवहाराचे योग्य मूल्यांकन काढण्यात आले असून सर्व व्यवहार चेकद्वारे होणार आहे. यामध्ये कसलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
या बैठकीला बाजार समितीचे सभापती,उपसभापती, संचालक व कारखान्याचे चेअरमन,व्हा.चेअरमन, संचालक मंडळ उपस्थित होते. यासाठीचे पैसे कसे उपलब्ध करायचे आणि कोणत्या पद्धतीने संचालक मंडळ पुढे जाणार याबाबत चर्चा झाली. याबाबत राज्यस्तरावरील आणि साखर आयुक्त स्तरावरील काही अडचणी आहेत त्या दूर करण्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाला सहसा कोणीही आव्हान देऊ शकत नाही हा निर्णय योग्य असल्याने त्याला चुकीचे म्हणण्याचे कोणतेही कारण नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
या दरम्यान मांजरी खुर्द येथे पी एम आर डी ए च्या वतीने दोन टिपी स्किम टाकण्यात आल्या आहेत. याला शेतकऱ्यांचा विरोधात असल्याचे व्हा चेअरमन किशोर उंद्रे यांनी सांगितले. यावेळी तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पी एम आर डी ए चे आयुक्त म्हसे यांना फोन करून शेतकऱ्यांचा या टीपी स्कीमला विरोध असेल तर त्या रद्द कराव्यात असा आदेश दिला.

Spread the love

Related posts

“राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार..

admin@erp

शिक्रापूर शाळेतील १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

admin@erp

तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात महिला सबलीकरण कार्यशाळा.

admin@erp