आरोग्यपुणेमहाराष्ट्रसामाजिक

मेन चौक प्रतिष्ठानचा उपक्रम : निर्माल्य संकलनामुळे पाणी प्रदूषणाला आळा…

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे गणेश विसर्जन निर्माल्य संकलन पाहताना पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड व मान्यवर.

प्रतिनिधी :- भगवान खुर्पे

विठ्ठलवाडीत बाराशे किलो निर्माल्य संकलित
तळेगाव ढमढेरे :- श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील
भीमा नदीच्या घाटावर बाराशे किलो गणेश विसर्जन निर्माल्य संकलित करण्यात आले.श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील मेन चौक प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून श्री पांडुरंग विद्यामंदिर या विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक प्रवीणकुमार जगताप व प्रा.संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तेरा वर्षांपासून भीमा नदीच्या घाटावर निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला जात आहे.
यावर्षी सकाळपासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत विठ्ठलवाडीसह तळेगाव ढमढेरे,शिक्रापूर, निमगाव म्हाळुंगी, वाघोली, पुणे आदी ठिकाणांहून गणेशभक्तांनी घरगुती गणपती व विविध मंडळाच्या गणपती मूर्तींचे श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील भीमा नदीच्या गणेश विसर्जन घाटावर  विसर्जन केले.दिवसभरात साधारण अकराशे किलो निर्माल्य संकलित करण्यात आले.यावेळी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड निर्माल्य संकलनाचा उपक्रम पाहण्यासाठी सदिच्छा भेट दिली.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजी गवारे,भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर दोरगे,मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, संभाजी शिंदे,पोलिस पाटील शरद लोखंडे,प्रकाश गवारे,ॲड.संतोष गवारे,के. टी. कोतवाल आदी उपस्थित होते.
बोटीतून मूर्तीचे विसर्जन भीमा नदीच्या काठावर गणेशभक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गणेश विसर्जन आपत्ती व्यवस्थापनासाठी जयेश शिंदे व मित्रपरिवाराने लोकार्पण केलेल्या बोटीतून स्वयंसेवक गणेश आंबेकर,बाळासाहेब गोंडावळे व चंद्रकांत गवारणे यांनी गणपती मूर्तीचे विसर्जन केले.विशेषतः बोटीतून आपल्या गणपती मूर्तीचे विसर्जन पाहताना गणेश भक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता.निर्माल्य व्यवस्थापनासाठी मेन चौक प्रतिष्ठानच्या दिनेश राऊत,श्यामराव गवारे,महादेव पवार, बाबू यादव आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love

Related posts

वाघेश्वर प्रवेश द्वाराच्या चौकटीसाठी २२लाखाचे दान.

admin@erp

जास्वंदीच्या फुलांचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदे..

admin@erp

नारळ पाणी पिण्याचे फायदे..

admin@erp