Uncategorizedआयुर्वेदिकआरोग्य

मुगाच्या डाळीचे फायदे

प्रतिनिधी: – नूतन पाटोळे

• हृदय निरोगी राहते या डाळीचे सेवन आठवड्यातून एकदा तरी करावे. त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हे स्नायूंच्या आकुंचनाला प्रतिबंध घालत असल्याने त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी मोड आलेल्या मूग डाळीचा नेहमी आहारात समावेश करावा.

• वजन कमी होते कोलीसिस्टोकाइनिन या हार्मोनचे कार्य सुधारण्यासाठी मूग डाळ खूप चांगली आहे. हा हार्मोन आपल्याला पोट भरल्याचे समजते. या हार्मोनमुळे पचनक्रियादेखील सुधारत असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दुपारच्या जेवणात भाताबरोबर किंवा पोळीसोबत मुगाच्या दाळीचे सेवन चांगले मानले जाते. सकाळी मोड आलेल्या मुगाची उसळ नाश्त्या साठी उत्तम असते

• मधुमेह मूग डाळ कमी ग्लायसेमिक इंडेक्ससाठी ओळखली जाते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. मोड आलेल्या हिरव्या मूगाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, यातून रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढत असते.

• पचनसंस्था निरोगी राहते मूग डाळ आतड्यात ब्युटीरेट नावाचे फॅटी अॅसिड तयार करण्यास मदत करते. हे आपल्या आतड्यांसाठी खूप चांगले आहे. यामध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

• रक्ताभिसरण सुधारते मुगाच्या डाळीचे सेवन रक्ताभिसरणासाठी खूप चांगले आहे. यामध्ये लोह असते जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते. हे अॅनिमियापासून बचाव करण्यास देखील मदत करते. प्रतिकारशक्ती वाढवते मूग डाळीमध्ये विशेष गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक पेशी मजबूत ठेवतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी आणि फ्लूची समस्या दूर राहण्यास मदत होते, त्यामुळे नेहमी आपल्या आहारात मोड आलेल्या मुगाच्या डाळीचा समावेश नक्की करावा.

Spread the love

Related posts

ब्ल्यूबेरी खाण्याचे फायदे …

admin@erp

तमालपत्राचे फायदे ….

admin@erp

admin@erp