पुणेमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

‘मुख्यमंत्री सहायता निधीसाठी’ रोहिदास उंद्रे यांच्या वतीने आर्थिक मदत…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२६: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे यांनी राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुरग्रस्त बांधवांना एक मदतीचा हात पुढे करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये रक्कमेचा धनादेश मुंबई येथे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, रोहिदास उंद्रे, रमेश उंद्रे उपस्थित होते.
याप्रसंगी रोहिदास उंद्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेलं अतोनात नुकसान यातुन बळीराजा सावरण्यासाठी एक कर्तव्य म्हणून हा धनादेश सुपूर्त केला तसेच अशा कामांमध्ये नेहमीच योगदान देण्याची भुमिकाही व्यक्त केली. सामाजिक जाणिवेतून दिलेले हे योगदान नक्कीच प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखवली. काही वर्षांपूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले होते त्यावेळी उंद्रे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तेथेही मदतीचा हात पुढे केला होता.

Spread the love

Related posts

मांजरी,कोलवडी येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

admin@erp

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात कुठलाही गैर व्यवहार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार…

admin@erp

तळेगाव येथे उपद्रवी हुमणी किड प्रतिबंध प्रशिक्षण संपन्न.

admin@erp