दिनांक : 14-12-2025
स्थळ : श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल, शिक्रापूर (मलठन फाटा)
श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल, शिक्रापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख मान्यवर आदरणीय रेश्मा पुणेकर ( क्रिडा अधिकारी, बेसबॉल चॅम्पियन, शिवछत्रपती अवॉर्ड),सानिका धायरकर (महाराष्ट्र राज्य कबड्डी संघ कर्णधार)शाळेचे संचालक सोमनाथ तात्या सायकर सर, अध्यक्षा मनिषा सायकर मॅम, प्राचार्य संदीप चौधरी सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धांमध्ये पालकांसाठी संगीत खुर्ची, दोरीखेच, वॉलीबॉल, डॉज बॉल, स्कॉट व्हॉल्डिंग तसेच इतर विविध स्पर्धांचे मनोरंजक व शारीरिक खेळांचा समावेश करण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध सांघिक तसेच वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी व पालकांनी या खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपली क्रीडास्फूर्ती दाखवून दिली. खेळादरम्यान टाळ्यांचा कडकडाट व जल्लोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक विशाल गुजर सर आणि आकाश वाडेकर सर तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेच्या शेवटी विजेत्या पालकांना सन्मानपत्र व पदके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकांनी आपल्या मनोगतातून आनंद व्यक्त करत शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमामुळे पालक व शाळा यांच्यातील नाते अधिक दृढ झाले असून, सर्वांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका सौ.वर्षा व राणी मॅडम यांनी केले, तसेच सौ.श्रद्धा बनकर व नीता मॅडम(उपप्राचार्यां) यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
