प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी दि.२४: हवेली तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये शेकडो हून अधिक विवाह संपन्न झाले. परंतु गेल्या सात ते आठ दिवसांमध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे लग्न समारंभ जागरण गोंधळ सत्यनारायण पूजा या कार्यक्रमावरही याचा परिणाम झाल्याचा दिसून येतो. बरेचसे विवाह सोहळे हे कार्यालयामध्ये संपन्न होत आहेत. यादरम्यान विवाह सोहळ्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याला सुरुवात होते. त्यामुळे या कार्यक्रमावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेक जण पाऊस पडत असल्याने कार्यक्रमापूर्वीच निघून गेल्याचे दिसून आले. त्यातच सातचा टाइमिंग असणारा विवाह सोहळा नऊ वाजता होत असल्याने लोकांना यामध्ये नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन दोन तास लग्न सोहळा उशिरा होत आहे. त्यामध्ये सत्कार समारंभ नेतेमंडळींचे आशीर्वाद पर भाषण यामध्ये खूप मोठा वेळ जात आहे. यावर निर्बंध येतील का? असा प्रश्न उपस्थित नागरिक करत आहेत.
विवाह सोहळा झाल्यानंतर दोन दिवसात सत्यनारायण पूजेचे व जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते यावरतीही पावसाचा परिणाम झालेला दिसून येतो. त्यातच वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे. सत्यनारायण पूजेनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहभोजनावरही परिणाम झाल्याचा दिसून येत आहे. काही ठिकाणी पावसातच कार्यक्रम पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.