महाराष्ट्रराजकीय

माजी सरपंच संजय जगताप यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे केले आव्हान.

प्रतिनधी: – निलेश जगताप

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील माजी सरपंच व शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक संजय जगताप यांची राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळेस प्रमुख उपस्थितीमध्ये शिरूर तालुक्याचे माजी आमदार अशोक पवार माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे , देवदत्त निकम, विजयराव कोलते, सोमनाथ भुजबळ , आबासाहेब करंजे, पूजाताई भुजबळ , काकासाहेब चव्हाण , दादासाहेब मांढरे उपस्थित होते. संजय जगताप यांनी शिक्रापूर ग्रामपंचायत सरपंच पदावरती काम करीत असताना गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अनेक ऐतिहासिक कामे गावामध्ये उभी केली, त्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या काळामध्ये चौका चौकामध्ये हाय मॅक्स लाईटचे पोल असतील किंवा जल जीवन महाराष्ट्र शासनाच्या योजनेला गती देण्याचे काम असेल शिक्षण असेल शेती असेल किंवा परिसरातील व्यवसायिकांना सहकार्य किंवा शासनामार्फत घरकुले अपंगांना मदत अशा विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी अतिशय धाडसाने केले.

सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण न करता मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी करण्यासाठी ते कटिबद्ध राहिले . हीच त्यांची कामाची पावती म्हणून त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष या अतिशय महत्त्वाच्या पदावरती काम करण्याची संधी पक्षांच्या नेते मंडळींनी दिली.यावेळी संजय जगताप बोलताना म्हणाले की मला पक्षाने दिलेल्या संधीचा उपयोग तळागाळातील सर्वसामान्य घटकांसाठी मी भविष्यामध्ये निश्चित करेल व देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम मी निश्चित करेल.व उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका येत असताना पक्षांनी जर मला संधी दिली तर मी निश्चितच संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही अशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली व त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Spread the love

Related posts

युवा नेते राहुल दादा यांचा कामाचा धडाका 24 तासात दहिवडी उकले वस्ती ट्रान्सफर डीपी बसवण्यात यश.

admin@erp

सोनेसांगवी शाळेचे शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत दुहेरी यश.

admin@erp

राजा शिवछत्रपती मतिमंद निवासी शाळेमध्ये वसंत नाईक जयंती उत्साहात संपन्न

admin@erp