प्रतिनिधी :- निलेश जगताप
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष तथा निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर, जि. पुणे) चे माजी आदर्श सरपंच श्री. बापूसाहेब बबनराव काळे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन तर्फे “महाराष्ट्र कीर्ती पुरस्कार 2025” देऊन गौरविण्यात आले. पुण्यात झालेल्या या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
ग्रामविकास, समाज प्रबोधन, युवकांसाठी क्रीडा व सांस्कृतिक प्रोत्साहन, तसेच शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदान याबद्दल श्री. काळे यांची विशेष दखल घेण्यात आली.
श्री. काळे यांनी 2023 ते 2025 या कालावधीत निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच म्हणून कार्य करताना पारदर्शक व जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन उभारले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शैक्षणिक प्रोत्साहन, महिला सक्षमीकरण, तसेच युवकांसाठी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबवून त्यांनी गावाला “आदर्श ग्राम” दर्जा मिळवून दिला.
सध्या ते शिवराज्य प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय असून, आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सव आणि राष्ट्रीय योग दिनानिमित्ताने योग दिवस घेणारे ते गावात पहिले सरपंच ठरले अशा प्रकारचे विविध उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित केले आहेत. तसेच शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी गोषाळा प्रकल्प व दुग्ध व्यवसाय विकास उपक्रम हाती घेतले आहेत.
सन्मान सोहळ्यात बोलताना मान्यवरांनी मत व्यक्त केले की,त्यांना लोकमत अवॉर्ड सह अनेक पुरस्कारांनी मागील काळात गौरवले असून “बापूसाहेब काळे हे केवळ सरपंच म्हणूनच नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ते, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. त्यांचा ग्रामविकासाचा अनुभव महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल.”