पुणे

मांजरी वाघोली रस्त्यावर बिबट्याचा बनावट व्हिडिओ आला समोर..

बनावट व्हिडिओ बनविणाऱ्यास पोलीसांनी घेतले ताब्यात.

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.६: मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील मांजरी वाघोली रस्त्यावर इंडियन पेट्रोल पंपाच्या समोर ,नवीन VTP रोडला बिबट्या दिसला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावात खळबळ माजल्याने याबाबत शक्यता तपासली असता सदरचा व्हिडिओ A I च्या माध्यमातून बनवून तो व्हायरल केला होता. हा बनावट व्हिडिओ बनविणाऱ्या तरुणाला पकडले असून त्याच्यावर वनविभाग पोलिसांच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. येथील पेट्रोल पंपाच्या समोरील रस्त्यावर वाहनाच्या समोर बिबट्याचा कळप फिरताना दिसत असून त्यामध्ये सहा बिबट्या असल्याचा व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे मांजरी तसेच परिसरामध्ये नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. वनविभागाला याची माहिती देऊन व्हिडिओची सत्यता ग्रामस्थ व वन विभागाने तपासली असता तो बनावट व्हिडिओ असल्याचे समोर आले. सदरचा व्हिडिओ वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने बनविल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणावर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. वनविभाग पोलिसांच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. मांजरी भागामध्ये वारंवार बिबट्या नागरिकांना दिसत आहेच मात्र बनावट व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सत्यता तपासल्यानंतर मांजरी येथील नागरिकांनी व्हिडिओ फोटो फेक असल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे.
शुक्रवार (ता.५) रोजी रात्री मांजरी वाघोली रस्त्यावर बिबट्या दिसल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर पोलीस पाटील भारती उंद्रे व काही नागरिकांनी वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरख यांच्याशी संपर्क साधला. काही नागरिकांनी आमदार बापूसाहेब पठारे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. यानंतर शनिवारी (ता.६) रोजी वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरख घटना स्थळी दाखल झाले व परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली. फेक व्हिडिओ बनविणाऱ्या तरुणाला वनकर्मचारी ज्ञानेश्वर शिवले व बाळासाहेब जिवाडे यांच्या मार्फत वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तेथे त्याला समज देण्यात आली. पुन्हा अशी चुक करणार नाही अशी कबुली त्याने दिली.

याबाबत बोलताना मांजरी खुर्दच्या पोलीस पाटील भारती उंद्रे यांनी सांगितले की, मोबाईल वर जेवढ्या या पोस्ट पडल्या होत्या त्या सर्वांना फोन करून ही पोस्ट कुणी टाकली याबाबत सर्वांशी संपर्क साधला साधारण दोन तीन तासांनंतर संबंधित तरुणांपर्यंत पोहोचता आले. याबाबत चौकशी केली असता ती पोस्ट चुकीची असल्याचे त्यानी सांगत माफी मागितली. त्याला वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. व्हिडिओ बनविणाऱ्याचा शोध लावल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी पोलीस पाटील भारती उंद्रे यांचं कौतुक केले.

वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरख म्हणाले की,संबंधित तरुणाला पोलीसांच्या ताब्यात दिले असून त्याला समज देण्यात आली व परत अशी चुक करणार नाही असे लेखी स्वरुपात वाघोली पोलीसांनी लिहून घेतले आहे.परिसरात पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येईल. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.

Spread the love

Related posts

आलेगाव पागा येथे वन विभागाच्या माध्यमातून बिबट जनजागृती मोहीम सुरू

admin@erp

मांजरीत संविधान दिन उत्साहात साजरा…

admin@erp

नशा मुक्ती जनजागृती अभियान एक महत्त्वाचे अभियान: सर्जेराव कुंभार..

admin@erp