प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
- मांजरी ता.२ : मांजरी बुद्रुक येथील मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शारदा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अजित घुले व मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, रक्तदान व सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
- यावेळी बोलताना अजित आबा घुले म्हणाले की ,अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये आरोग्यजागरूकता वाढून “माझा प्रभाग – माझी जबाबदारी” हा संदेश अधिक दृढ होत आहे..! तसेच सामाजिक बांधिलकीतून महाआरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले असून आज या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
- नागरिकांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर्सकडून तपासणी, मार्गदर्शन व उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये नेत्ररोग तपासणी शिबीर, अस्थिव्यंगोपचार, मेंदूरोग, नाक-कान-घसा, कर्करोग, जनरल मेडिसिन, ग्रंथीचे विकार, गुप्तरोग, लठ्ठपणा, मूत्ररोग, हृदयरोग, स्त्रीरोग, श्वसन विकार आणि क्षयरोग, आयुष आदी सर्व उपचार व तपासणी हे मोफत करून शस्त्रक्रिया देखील मोफतच केली जाणार असल्याचे अजित घुले यांनी सांगितले .
- तसेच रक्तदानासारख्या महान कार्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजहितासाठी नागरिकांनी दाखविलेल्या या सहभागाचे घुले यांनी समाधान व्यक्त केले.
- अजित आबा घुले यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मांजरी परिसरातील परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा एका ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी आभार व्यक्त केले.
