प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.२९: मांजरी खुर्द येथे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या स्थानिक विकास निधीतून वाघजाई वस्ती, माणिकनगर याठिकाणी राजेंद्र उंद्रे घर ते शिव रस्ता तयार करणे यासाठी दहा लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे भुमीपुजन शुक्रवार (ता.२९) रोजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या शुभहस्ते व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश सावंत, माजी सरपंच विकास उंद्रे,पै. बाळासाहेब भोसले सिताराम उंद्रे, सुरेश उंद्रे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. शिवदीप उंद्रे, अध्यात्मिक विकास परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प.जगदीश महाराज उंद्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या रस्त्यामुळे शेतकरी व येथील ग्रामस्थांची रस्त्याची होणारी गैरसोय यामुळे थांबेल,तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून तेही काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल असे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.
यावेळी पोलीस पाटील भारती उंद्रे, ग्रामविकास अधिकारी मयुर उगले, ग्रामपंचायत सदस्य सागर उंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश उंद्रे, पत्रकार नाथाभाऊ उंद्रे, रोहिदास पवार, बाळासाहेब नेवाळे, रविंद्र काकडे,धनंजय जाधव, सोपान पवार, वसंत उंद्रे, संजय उंद्रे, आप्पा माने, सुनिल काकडे, वसंत उंद्रे, अशोक माने,नानासाहेब उंद्रे, लक्ष्मण उंद्रे, सचिन उंद्रे,अमित किंडरे,पै. महेश भोसले, हरिष जाधव, इ.अनेक मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.