प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
दिनांक : – 21 जुलै 2025 मांजरी खुर्द तालुका हवेली जिल्हा पुणे येथे माननीय श्री. महेश एकनाथ थोरात उपाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महेश थोरात मित्रपरिवाराने दिनांक 19 जुलै व 20 जुलै 2025 रोजी परिसरातील रहिवाशांसाठी आधार कार्ड कॅम्प ज्यामध्ये नवीन आधार कार्ड काढून देणे जुन्या आधार कार्डला अपडेट करून देणे तसेच मतदार नाव नोंदणी अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमांला परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत यामध्ये सहभाग घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच मित्र परिवाराने खूप परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.प्रामुख्याने अरविंद साखरे प्रदीप बडवाईक नवनाथ सावंत संजय मुसळे पुनम माने यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते सदरचा कार्यक्रम हा अथर्वसृष्टी गृह प्रकल्पातील क्लब हाऊस मध्ये राबविण्यात आला.
महेश थोरात यांनी सर्व मित्र परिवाराचे आभार मानले व कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले.
