पुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

प्रतिनिधी : – आशोक आव्हाळे

मांजरी ता.१६: मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची घंटा सोमवारी सकाळी वाजली. येथील शाळेमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, वह्या पुस्तके, शालेय गणवेश, दप्तर, शैक्षणिक साहित्य व चॉकलेट देऊन तसेच औक्षण करून मोठ्या आनंदात शिक्षकांनी स्वागत केले. इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला. सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले. शाळा भरल्यानंतर सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. सकाळी ढगाळ वातावरण व हलका पाऊस असून सुद्धा विद्यार्थ्यांनी आनंदात या प्रभात फेरीमध्ये सहभागी होऊन शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला. पालक शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या दिवशी उत्साहाचे वातावरण दिसून आले.
गेली महिना दोन महिने सुट्टी निमित्त बंद असलेली शाळा आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली. शाळेच्या गेट वरती रांगोळीच्या पायघड्या घातल्या गेल्या होत्या. मुलांना पहिल्याच दिवशी शालेय गणवेश, दप्तर, वह्या पुस्तके मिळाल्याने विद्यार्थी आनंदात होते. यावेळी विद्यार्थी व पालकांची गर्दी शाळेमध्ये दिसून आली. गावातील मान्यवर पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक विजय बदक व सहकारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य व चॉकलेट देऊन स्वागत करत त्यांच्या पालकांचेही आभार व्यक्त केले. शाळेची पटसंख्या चांगली असून अनेकांनी आपल्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत प्रवेश देण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सोनाली मुरकुटे, माजी सरपंच सिताराम उंद्रे, पोलीस पाटील भारती उंद्रे, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत उंद्रे, विजय उंद्रे व पालक उपस्थित होते.

Spread the love

Related posts

भाजपच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाने पुण्यात युतीला ब्रेक? महापौर आपलाच म्हणत फडणवीसांचे कामाला लागण्याचे आदेश…

admin@erp

भुजबळ विद्यालयाच्या वतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन..

admin@erp

मांजरी खुर्द येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

admin@erp