अनावधानाने काही घटना घडल्यास याला जबाबदार कोण?
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.२७: मांजरी खुर्द येथील ग्रामपंचायतने गावात चौका चौकात मोठ्या प्रमाणात खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असून हे सर्व सीसीटीव्ही तब्बल वर्षभरापूर्वी पासून कॅमेरे तुटलेल्या व बंद अवस्थेत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. येथील स्थानिक प्रशासनाला व ग्रामसेवकांना वेळ नाही. या बंद सीसीटीव्हीमुळे पोलीस यंत्रणेला आरोपी शोधण्यासाठी खुप कसरत करावी लागते. एखादा आरोपी गुन्हा करून एखाद्या सीसीटीव्ही समोरुन जरी गेला तरी त्याचा शोध घेणे सोपे होते. गावांमध्ये चोऱ्यांचे व गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असताना देखील अजुन स्थानिक प्रशासनाला जाग येत नाही. विशेषतः श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवलेला आहे. अनावधानाने काही घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. गावात अनेक घटना घडत असताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग फायदा चालू असताना झाला आहे. परंतु आज मितीला हे सर्व कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. या संदर्भात शासनाने लक्ष देऊन हे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामविकास अधिकारी मयूर उगले यांच्याशी संपर्क साधला असता सीसीटीव्ही कॅमेरे चालू करून घेऊ, चालू करायला सांगितलेले आहेत असे सांगितले गेले. परंतु आज तागायत हे कॅमेरे बंदच आहेत.
