प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.२२: मांजरी खुर्द (ता.हवेली) येथील प्रस्तावित मांजरी कोलवडी नगर रचना योजना-११ (टीपी स्कीम ११) शासनाने रद्द करण्याचा निर्णय नुकताच घेतल्याने येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या टीपी स्कीमला येथील स्थानिक शेतकऱ्यांनी सातत्याने विरोध दर्शविला होता. या निर्णयामागे सातत्याने चाललेली लढाई तसेच त्यांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या लोकप्रतिनिधींचे पाठबळ यामुळे यश मिळाले. गेल्या अनेक वर्षापासून प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत सातत्याने विरोध करण्यात आला होता. याला दुजोरा देत शासनाने सकारात्मक भूमिका घेत ही टीपी स्कीम योजना रद्द केली आहे.
मांजरी खुर्द गावातील वाघजाई परिसरात गेल्या ७ वर्षापूर्वी २०१८ मध्ये नगर रचना योजना करण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्या अनुषंगाने योजना जाहीर करून शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना देखील सदर प्रारूप योजनेस स्वत: तत्कालीन पी एम आर डी ए आयुक्त यांनीच मंजुरी दिलेली होती. स्थानिक शेतकऱ्यांनी या चुकीच्या योजनेस सुरवाती पासूनच विरोध दर्शविला होता. हि योजना मंजुरीसाठी लवाद यांनी शासनाकडे जानेवारी २०२३ मध्ये मंजुरीसाठी सादर केली होती. पी एम आर डी ए आणि लवाद स्थरावर शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही हे लक्षात आल्यावर सर्व शेतकऱ्यांनी शासनाकडे आपल्या अडचणी मांडल्या होत्या. तसेच सदर योजनेस आपली हरकत असल्याचे कळविले होते. वरील सर्व बाबींचा विचार करून शासनाने आपल्या स्थरावर योग्य चौकशी करून तसेच संचालक नगर रचना पुणे यांच्याशी सल्ला मसलत करून सदर योजना १६ जून २०२५ रोजी रद्द केली आहे.
मांजरी खुर्द गावातील सर्व शेतकऱ्यांनी या संदर्भात अन्याय कारक योजनेतून मुक्त केल्या बद्दल शासनाचे आभार व्यक्त करत भविष्यात देखील अशा कुठल्याही योजना आल्या तर स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही प्रक्रिया राबवू नये अशी आशा व्यक्त केली आहे. मांजरी खुर्दचे माजी उपसरपंच व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश सावंत यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना हा शेतकरी एकजुटीचा व आपण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच सदर योजने मध्ये कित्येक लहान शेतकऱ्यांना बेघर होण्याची वेळ आली होती, शेतकऱ्यांना मिळालेले अंतिम भूखंड हे अन्याकारक व गैरसोयीचे दिले गेले होते, या योजनेच्या भोवती संरक्षण विभाग भारत सरकार यांच्या जमिन तसेच एच पी सी एल यांची पेट्रोल डीझेल तेल वाहिनी आहे. परंतु पी एम आर डी ए प्रशासनाने ती बाब संपूर्ण दुर्लक्ष करून योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता असे सावंत यांनी सांगितले. अंतर्गत रस्त्यांची रुंदी ठरविताना प्रशासनाने वास्तविक परिस्थितीचा विचार न केल्याने बहुतांश शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. वरील अन्याकारक योजना नामंजूर झाल्याची अधिसूचना त्यांनी सर्व शेतकऱ्यांना दिली व समजावूनही सांगितली आणि योजना नामंजूर झाल्या बद्दल सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन करून सर्व शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरल्याचे समाधान व्यक्त केले.
वरील प्रसंगी मांजरी खुर्द व कोलवडी परिसरातील सर्व बाधित शेतकरी उपस्थित राहिले होते. त्यांनी योजना नामंजूर झाल्या बद्दल आनंद व्यक्त केला. तसेच सदर प्रक्रियेमध्ये गेली सहा सात वर्ष प्रशासनाचा पाठपुरावा केल्या बद्दल प्रकाश सावंत,रविंद्र काकडे, योगेश पवळे आणि शिवम उंदरे यांचे संजय उंदरे, शिवाजी शेळके, विश्वास उंद्रे व इतर शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी या संदर्भात मोलाचे सहकार्य झाल्या बद्दल सावंत यांनी आमदार बापूसाहेब पठारे , जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले, आमदार ज्ञानेश्वर आबा कटके, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, आमदार चंद्रकांत रघुवंशी पाटील आणि या प्रक्रियेत मदत झालेल्या सर्वांचेच आभार व्यक्त केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात बाधित शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान प्रकाश सावंत,रविंद्र काकडे,आपासाहेब माने, ज्ञानेश्वर पवळे, सोपान पवार, सत्यवान सावंत, संतोष मुरकुटे, संजय उंदरे, शिवाजी शेळके , विश्वास उंदरे, राजेंद्र उंदरे, भानुदास भोसले, सुनील काकडे , विलास काकडे, अभिजित उंदरे, योगेश पवळे, शिवम उंदरे, शुभम माने, शरद माने, सागर माने, सत्यवान माने, महेश भोसले, केतन उंदरे, सुमित उंदरे, संतोष उंदरे, सत्यवान उंदरे, आप्पासाहेब काकडे , पंडित माने, सोमनाथ काकडे , सोमनाथ उंदरे , संजय गायकवाड, राजेंद्र भोसले , अनंत जवळकर, सदाशिव मुरकुटे, आनंदा मुरकुटे, दत्तात्रय आव्हाळे, शंकर माने, नंदकुमार माने,सौरभ काकडे, शुभम काकडे, तेजस काकडे, ऋषिकेश सावंत, अनिकेत माने, विजय खोत, रोहित आव्हाळे, सचिन उंदरे, काळूराम सावंत, नवनाथ सावंत , अविनाश सावंत, संकेत सावंत, रविंद्र थोरात, नानासो काकडे, भाऊसाहेब मंडलिक,अमित आव्हाळे, अक्षय आव्हाळे, राजदीप सावंत हे सर्व शेतकरी उपस्थित होते.