प्रतिनिधी : – आशोक आव्हाळे
मांजरी ता.२१: मांजरी खुर्द, कोलवडी, आव्हाळवाडी परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये आबालवृद्धांपासुन ते तरुणाई यामध्ये उत्स्फूर्त सहभागी झाले होते. जिल्हा परिषद शाळा, आण्णासाहेब मगर विद्यालय मांजरी खुर्द, न्यु इंग्लिश स्कूल कोलवडी, जिल्हा परिषद शाळा आव्हाळवाडी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्रथमता योग दिनाचे महत्त्व मुख्याध्यापक विजय बदक तसेच दीक्षित मॅडम, आण्णासाहेब मगर विद्यालयाचे क्रिडा शिक्षक अनिल चंद, न्यु इंग्लिश स्कूल कोलवडीचे मुख्याध्यापक अरविंद सितापे, आव्हाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक साळवे के यांनी सांगितले. योगासनांचे विविध प्रकार शिक्षकांनी अतिशय सुंदर रित्या करून घेतले. यामध्ये प्राणायाम, वज्रासन वृक्षासन ,ताडासन ,ओंकार नाद घेण्यात आला. तसेच भुजंगासन, हलासन, मत्स्यासन, धनुरासन आणि सूर्यनमस्कार घेतला. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारकऱ्यांनीही योगासने करत हा योग दिन साजरा केला. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहल चव्हाण व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.