प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.३०: मांजरी खुर्द येथे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आण्णासाहेब मगर विद्यालयात संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद व आण्णासाहेब मगर विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक पालक,महिला व गावातील मान्यवर पदाधिकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच शांताराम उंद्रे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी सरपंच महादेव उंद्रे, स्वप्नील उंद्रे, माजी उपसरपंच हिरामण गवळी, ग्रामपंचायत सदस्य सागर उंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष रमेश उंद्रे, भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष माऊली उंद्रे, कल्पेश थोरात, सौरभ मुरकुटे, बाळासाहेब भोसले, धर्मेंद्र मोरे, विक्रम वाघमोडे,उपसरपंच मनीषा ढेरे, वर्षा मोरे,संगीता शिनगारे, ताई गायकवाड तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ठाकरे जे एल, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय बदक, शिक्षक, पालक, महिला, विद्यार्थी, शाळेचे कर्मचारी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे २५५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो .महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिडा शिक्षक अनिल चंद तर आभारप्रदर्शन विठ्ठल ढमे व धर्मेंद्र मोरे यांनी केले .
