प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.१६: ध्वजारोहण, मानवंदना, राष्ट्रगीत,संचलन, स्वागतगीत, स्वागत समारंभ, देशभक्तीपर गीते ,क्रिडा व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सामुदायिक संगीत कवायत, भाषणं, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप इ.भरगच्च कार्यक्रमांनी देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मांजरी खुर्द व परिसरात मोठ्या जल्लोषात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळेत एकल महिला सक्षमीकरण व स्वच्छतेची सामुदायिक शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी मांजरी खुर्द येथे ग्रामपंचायतचे ध्वजारोहण उपसरपंच मनिषा ढेरे,आण्णासाहेब मगर विद्यालयात तेजस उंद्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ग्रामपंचायत सदस्य सागर उंद्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यादरम्यान शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या व इ.दहावीतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा शाल,श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच या दरम्यान अमेरिकेत वॉशिंग्टन येथे आयुर्वेदाची डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आल्या बद्दल हभप जगदीश महाराज उंद्रे, शासनाच्या वतीने उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस पाटील भारती उंद्रे, पोलीस मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल लक्ष्मीताई गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच शांताराम उंद्रे ,विकास उंद्रे,सिताराम उंद्रे,पै. बाळासाहेब भोसले, विलास उंद्रे, महादेव उंद्रे, माजी पोलीस पाटील अंकुश उंद्रे, रोहिदास पवार, हनुमंत उंद्रे,पोलीस पाटील भारती उंद्रे, चेअरमन राजेंद्र उंद्रे, अमित किंडरे, सतिश आव्हाळे, सुरेश उंद्रे गौतम भोसले,हिरामण गवळी, मगर विद्यालयाचे मुख्याध्यापक ठाकरे जे के, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक विजय बदक, शिक्षक, कर्मचारी वर्ग, महिला व मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिडा शिक्षक अनिल चंद,
किशोर गडबडे यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठल ढमे, प्रतिभा लोहार यांनी केले.