Uncategorizedपुणेमहाराष्ट्रसामाजिक

मांजरीत अभुतपुर्व गर्दीत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम संपन्न.

मांजरी ता.५ : घर सांभाळत कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या, समाज घडवणाऱ्या प्रत्येक महिलेमधली प्रतिभा, आत्मविश्वास आणि आनंद जगासमोर आणण्यासाठी आज महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
या कार्यक्रमातून महिलांना केवळ मनोरंजनाचं नव्हे तर स्वतःला व्यक्त करण्याचं, आपली कला दाखवण्याचं आणि सन्मान मिळवण्याचं व्यासपीठ मिळालं. महिलांचा सन्मान, त्यांचं सक्षमीकरण आणि त्यांच्या प्रश्नांबद्दलची आपुलकी हेच आमचं राजकारण आहे ,हेच या उपक्रमातून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असल्याचे आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कोमल संदेश आव्हाळे व पंचायत समितीच्या उमेदवार सुषमा संतोष मुरकुटे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटातील उमेदवार कोमल संदेश आव्हाळे व पंचायत समितीच्या उमेदवार सुषमा संतोष आप्पा मुरकुटे तसेच माजी सरपंच, श्रावणबाळ संदेश आव्हाळे, साई गणेश ना.सह. पतसंस्थेचे चेअरमन संतोष आप्पा मुरकुटे यांनी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन मांजरी खुर्द येथे भव्य दिव्य स्वरुपात केले होते. या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. एवढ्या थंडीतही विनोदी उखाणे, नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाने महिलांमध्ये उत्साह संचारला होता. विशेषत: वृध्द महिलांनी मनसोक्त नाचत आनंद घेत आपणही काही कमी नाही हे दाखवून दिले.
या होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा मधील विजेत्या महिला पुढीलप्रमाणे,

  1. काळे सुजाता तुळशीराम – प्रथम पारितोषिक न्यू होंडा एक्टिवा व पैठणी
  2. भगत छाया ईश्वर – द्वितीय पारितोषिक फ्रिज
  3. वाघमारे प्रियंका महेंद्र – तृतीय पारितोषिक वॉशिंग मशीन
  4. गायकवाड निशा राहुल – चतुर्थ पारितोषिक एलईडी टीव्ही
  5. मोरे दिपाली दत्तात्रय – पंचम पारितोषिक गॅस शेगडी

तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहीलेल्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला यामधील विजेत्या महिला,

  1. जगताप मीना बाळासाहेब – इलेक्ट्रिक स्कूटर
  2. उके अर्चना विष्णू – मोबाईल फोन
  3. गायकवाड पायल जयराम – सोन्याचे नथ
  4. उंद्रे सोनाली जयवंत- सायकल
  5. उंद्रे दिपाली विजय – पैठणी
    या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिलेस एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली. या होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांनी अभुतपुर्व प्रतिसाद दिला त्या बद्दल आम्ही सर्वांचा आभारी आहे अशा भावना यावेळी संदेश आव्हाळे व संतोष मुरकुटे यांनी व्यक्त केल्या.
Spread the love

Related posts

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे ..

admin@erp

फुरसुंगी- विद्यार्थी गोविंदा रमले दहीहंडी उत्सवात

admin@erp

पोटच्या गोळ्याला फेकुन पसार झाली आई, महिला पोलिस बनल्या दायी

admin@erp