देशपुणेमहाराष्ट्र

मांजरीच्या रेल्वे उड्डाणपूलावर पथदिवे लावा…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.४: मांजरी बुद्रुक येथील मुख्य रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल ते मुळा-मुठा नदी, रेल्वे उड्डाणपुलालगतचे सेवा रस्ते,मांजरी गावठाण ते भापकर मळा – मोरे वस्ती- मांजरी फाटा सोलापूर रोड, मांजरी मुंढवा रोड, म्हसोबा वस्ती ते गोडबोले वस्ती, घावटे वस्ती रोड, मांजरी ग्रीन ते गोपाळपट्टी चौक, घुले वस्ती कालव्या नजीकचा रस्ता- चौक, रंगीचा ओढा नजीकचा रस्ता आदी प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यावर पथदिव्यांची उभारणीच करण्यात आलेली नाही तर काही ठिकाणी पथदिवेच बंद असल्याने नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावाही करण्यात आलेला होता, परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचे प्रवीण रणदिवे यांनी सांगितले. याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मांजरी बुद्रुक गावच्या वतीने महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांना कंदील भेट देण्यात आला. याप्रसंगी प्रवीण रणदिवे, विभाग संघटिका वर्षा खलसे, संतोष ढोरे, किरण खलसे आदी उपस्थित होते.
अगोदरच अरुंद असलेले तसेच ठिकठिकाणी खड्डे पडलेले ओबडधोबड रस्ते, वाहनांची वाढलेली संख्या तसेच पथदिवे बंद असल्याने वारंवार वाहन चालकांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. सदर रस्ते वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनलेले आहेत.विशेषतः रात्रीच्या वेळी तर रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक जण अपघातात कायमचे जायबंदी झालेले आहेत. तर वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
प्रामुख्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून रखडलेल्या रेल्वे उड्डाणपूल ते मांजरी गावठाण दरम्यानचा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या व स्थापत्य शास्त्राचा अजब नमुना असलेल्या या रेल्वेउड्डाणपुलावर दोन ठिकाणी अपघातप्रवण वळणे असल्याने तसेच पथदिवेच नसल्याने काही जणांचे बळी गेले असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.
हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे समाविष्ट गावासाठी असलेले विद्युत विभागाचे बजेट हे तुटपुंज असल्याने त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य विद्युत विभागाने याची तातडीने दखल घेऊन येत्या पंधरा दिवसाच्या आत मांजरी बुद्रुक मधील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे आवश्यक त्या निधीची तरतूद करून तातडीने पथदिवे बसविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली.

Spread the love

Related posts

राजा शिवछत्रपती मतिमंद निवासी शाळेमध्ये वसंत नाईक जयंती उत्साहात संपन्न

admin@erp

पुण्यात प्रभाग रचना बदलली जाणार, कशी असणार नवीन रचना? आज येणार महत्त्वाची अपडेट.

admin@erp

राजे श्री शिवशाही समूहाचे 11 वे वर्धापन दिन थाटात संपन्न…

admin@erp