पुणेव्यवसाय

मांजरी,कोलवडी परिसरात मुसळधार पाऊस

भाजीपाला पिकांचे नुकसान

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.१९: मांजरी खुर्द, कोलवडी परिसराला रविवार (ता.१४) रोजी रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह धुवांधार जोरदार पावसामुळे शेतमालासह मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असुन घरातील धान्य व इतर वस्तू भिजल्या आहे.नैसर्गिक ओढ्याचे स्त्रोत बंद झाल्याने अनेक रस्त्यांवर पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.‌ येथील इंदिरा नगर ते माणिक नगरचा रस्ता पाण्याखाली गेला असून जनजीवन विस्कळित झाले आहे.
या पावसाने शेतात पाणी साचल्याने भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.‌ या पावसामुळे शेतातील कामे बंद झाली आहे. या पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. ड्रॅगन फूड, झेंडू, भाजीपाला, ऊसातुन पाणी वहात आहे. सर्वत्र रस्ते जलमय झाले आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असुन शाळांना सोमवारची सुट्टी जाहीर केली आहे. कोलवडी मांजरी रस्त्यावर पाणी आल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
मांजरीतील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने या भागाचे सर्कल अधिकारी संदीप शिंदे व तलाठी सुधीर जायभाय यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत पंचनामे केले असून नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले. हे पंचनामे आम्ही शासनाला त्वरित पाठवणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Spread the love

Related posts

शिक्रापूर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळा मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीमार्फत सन्मान….

admin@erp

अमरज्योत गणेशोत्सव मित्रमंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रमावर भर

admin@erp

डॉ.चंद्रकांत केदारी यांसकडुन गुजर प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप..

admin@erp