प्रतिनधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.७: गेल्या अकरा दिवसापासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठया उत्साहात व आनंदाच्या वातावरणात विघ्नहर्त्या श्री गणरायास मांजरी,कोलवडी परिसरात अनंत चतुर्दशीला निरोप देण्यात आला. भाविकांच्या ओंसडून वाहणाऱ्या उत्साहात गणेश विसर्जन करण्यात आले. मांजरी खुर्द येथे श्री चिंतामणी मित्र मंडळ, थोरात ग्रुप, शिवक्रांती, माणिक, आदर्श, वाघजाई इ.मंडळानी अतिशय साध्या पद्धतीने डि जे विरहित वातावरणात मुळा मुठा नदीच्या काठावर गणेश विसर्जन केले. तसेच अथर्व सृष्टी मित्र मंडळाने पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या जल्लोषात मिरवणूक काढली होती. यावेळी या वाद्यांच्या गजरात अवघी तरुणाई थिरकली होती. या दरम्यान महिला ,आबालवृध्द पारंपरिक पोषाख परिधान करून मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तसेच येथे येणारे निर्माल्य नदी पात्रात न टाकता ते गोळा करून कचरा गाडीत जमा केले जात होते.