प्रतिनिधी :- निलेश जगताप
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री महेश दादा लांडगे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त चॅरिटी फाउंडेशन Pristine इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्यातर्फे माजी सैनिक विकास संघ दिघी यांच्या पार्किंग मध्ये वार बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीचे सीएमडी डॉक्टर प्रवीण बढे, MD, Ph.D (आयुर्वेदा) हे आवर्जून या शिबिरासाठी उपस्थित होते. निरोगी आयुष्य- समृद्ध जीवन आणि आयुर्वेद या विषयावरती सर्व उपस्थित जनसमुदायाला त्यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर गजानन मोरे ,डॉक्टर कल्याण जगदाळे, डॉक्टर नेहा खान, डॉक्टर प्रिया बापटे यांनी सर्व पेशंटला जर्मन टेक्नॉलॉजी या बॉडी स्कॅनिंगमशीनद्वारे चेकअप करून मार्गदर्शन केले.यावेळी माजी सैनिक विकास संघाचे अध्यक्ष कॅप्टन भास्कर आंब्रे,उपाध्यक्ष कॅप्टन आमम्सिद्ध भिसे, सुभेदार सुरेश वहिले,तंटामुक्ती अध्यक्ष, नगरसेवक श्री विकासभाऊ डोळस,संकल्पना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री कुलदीपभाऊ परांडे, NCP अजित दादा ग्रुप सैनिक सैनिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री अमित मोहिते,माजी सैनिक विकास संघ पुरस्कृत बीजेपी उमेदवार माजी सैनिक श्री कृष्णा सुरकुले, नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री संजय भाऊ गायकवाड, नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री उदय भाऊ गायकवाड, , ग्रुप सुभेदार मेजर वामन वाडेकर, सुभेदार श्री वसंत पाटील खजिनदार, सुभेदार एमडी पाटील सुभेदार मेजर गोपाळ निंबाळकर माजी सैनिक विकास संघाचे संचालक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत शिबिराचा लाभ 1300 सैनिक सिव्हिल परिवार यांनी लाभ घेतला.
